जळगाव जिल्हा

Lumpy Skin : पहूरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, ताबडतोब लसीकरण करण्याचे आवाहन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahur News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । पहूर येथे ‘Lumpy Skin’ रोगाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी १० वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशु मालक यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुंवर सर्व मालकांनी ताबडतोब लसीकरण करून घ्यावे, व ग्रामपंचायतिने मदत करावी असे आवाहन केले.

यादरम्यान अभिजीत राऊत यांनी पहूर कसबे येथील समाधान कचरे यांच्या लंपी आजाराने बांधीत झालेल्या बैलाची पाहणी केली. तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉ. राठोड यांच्याशी येथील परिस्थिती संदर्भात सविस्तर माहिती घेतली. यावेळी लवकरात लवकर अतिरिक्त पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी सरपंच लोकनियुक्त नीता पाटील, सरपंच शंकर जाधव, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, आरोग्यदुत अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषदसदस्य राजधर पांढरे, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे, भारत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड, तलाठी जैन, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button