आनंदाची बातमी ! LPG सिलिंडर झाला आणखी स्वस्त, नवीन दर आजपासून लागू

एप्रिल 1, 2024 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने जनतेला स्वस्त एलपीजी सिलिंडरची भेट दिली आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आज (1 एप्रिल) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली. सिलिंडरच्या दरात कपात झाल्यानंतर महागाईतून जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे.

Untitled design 7 jpg webp

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 32 रुपयांची कपात केली आहे. नवीन दर आज म्हणजेच 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर (14 किलो) च्या किमती स्थिर आहेत आणि त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर जुन्याच दरात मिळत राहतील.गेल्या महिन्यात 14 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.

जाणून घ्या काय आहे 19 किलोच्या सिलेंडरची किंमत
सोमवारी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 30.50 रुपयांनी कपात केल्यानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1,764.50 रुपये झाली आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,879 रुपयांपर्यंत वाढली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरच्या दरात 32 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर मुंबईत 19 किलो सिलेंडरच्या किमतीत 31.50 रुपयांनी कपात केल्यानंतर तो 1,717.50 रुपयांना उपलब्ध झाला आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,930 रुपये झाली आहे. येथे सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी झाली आहे.

गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती. खरं तर, महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LPG सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट जाहीर केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही दिलासा देण्याचे बोलले होते. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडरवर 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now