जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी ४८ वर्षीय महिलेला जबरी लग्न करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, संशयित आरोपी रविंद्र कल्लू पवार रा. जुना सावदा रोड श्रीराम कॉलनी रावेर हा हा महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज टाकून तिला आय लव यू राणी असे अनेक मॅसेज टाकत गेला. दरम्यान, त्यानंतर महिलेच्या घरी जावून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तू जर माझ्याशी लग्न केला नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माहिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविंद्र कल्लू पवार याच्याविरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राहूल मोरे करीत आहे.