ऐका हो : उत्सव काळात उपद्रवींवर पोलिसांची नजर
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव उत्साहाने साजरा करावा मात्र या काळात शांततेला गालबोट लागता कामा नये यासाठी उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर असेल, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथे सांगितले. वरणगाव पोलिस ठाण्याच्या सभागृहात गणेशोत्सव व येणार्या सणानिमित्त गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक बुधवारी झाली.
डिजेला परवानगी नाहीच
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पदाधिकारी रात्रं-दिवस परीश्रम घेतात मात्र अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणूकीत डिजेच्या तालावर काही भक्त मद्यधुंद अवस्थेत नाचताना दिसतात यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड होतो. डीजेला परवानगी नसल्याने पारंपरीक वाद्यांचा वापर करावा, विसर्जन मिरवणूकीत अशांतता निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तर उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर असेल, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. संतोष माळी, महेश सोनवणे, शेख सईद शेख भिकारी यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांनी मानले. बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, जाफरअली सिकंदरअली (हिप्पी सेठ) यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, मंडळाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव होते. यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, होमगार्ड े समुपदेशक संजय चौधरी व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.