⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ तालुक्यावर शोककळा! नेपाळमधील बस अपघातातील प्रवाशांची यादी समोर

भुसावळ तालुक्यावर शोककळा! नेपाळमधील बस अपघातातील प्रवाशांची यादी समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांची बस नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघातात १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात अनेक गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह या गावातील भाविक देवदर्शनासाठी गेले होते. हे भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. मात्र त्यांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय.

केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस (UP 53 FT 7623) गोरखपूरहून नेपाळला गेली होती. बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात कोसळली. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ३१ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघात ग्रस्त बसमध्ये वरणगाव येथील माजी नगरसेवकांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, राज्य सरकार नेपाळच्या दुतावासांशी संपर्कात असून जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेश येथील महाराजगंज येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी संबंधिक अधिकारी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रवाशांची यादी समोर
अनंत ओंकार इंगळे
सीमा अनंत इंगळे
सुहास राणे
सरला राणे
चंदना सुहास राणे
सुनील जगन्नाथ धांडे
निलीमा सुनील धांडे
तुळशीराम बुधो तायडे
सरला तुळशीराम तायडे
आशा समाधान बावस्कार
रेखा प्रकाश सुरवाडे
प्रकाश नथु सुरवाडे
मंगला विलास राणे
सुधाकर बळीराम जावळे
रोहिणी सुधाकर जावळे
विजया कडू जावळे
सागर कडू जावळे
भारती प्रकाश जावळे
संदीप राजाराम सरोदे
पल्लवी संदीप सरोदे
गोकरणी संदीप सरोदे
हेमराज राजाराम सरोदे
रुपाली हेमराज सरोदे
अनुप हेमराज सरोदे
गणेश पांडुरंग भारंबे
सुलभा पांडुरंग भारंबे
मिलन गणेश भारंबे
परी गणेश भारंबे
शारदा सुनील पाटील
कुमुदिनी रविंद्र झांबरे
शारदा सुनील पाटील
निलीमा चंद्रकांत जावळे
ज्ञानेश्वर नामदेव बोंडे
आशा ज्ञानेश्वर बोंडे
आशा पांडुरंग पाटील
प्रवीण पांडुरंग पाटील
सरोज मनोज भिरुड
पंकज भागवत भगाळे
वर्षा पंकज भंगाळे
अविनाश भागवत पाटील
अनिता अविनाश पाटील
मुर्तीजा (ड्रायव्हर)
रामजीत (वाहक).

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.