जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । येथील नामांकित ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत यांना प्रेरणा दर्पण फाउंडेशनचा “जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दि.७ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आपला व्यवसाय सांभाळत ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रेरणा दर्पण फाउंडेशन या संस्थेने “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर केला असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दर्पण पुरस्कारासाठी आजवर लाभलेले मान्यवर
जगप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास, मराठी, हिंदी अभिनेता सचिन खेडेकर, माजी मंत्री गिरीश बापट, प्रसिद्ध साहित्यिक स्व. अरुण साधू,माजी मंत्री सुरेशदादा जैन, देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती प्रमुख, राजेश राजोरे, मराठी प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे, राज्यसभा सदस्य खा. भरतकुमार राऊत, प्रसिद्ध स्तंभ लेखक भाऊ तोरसेकर, दैनिक जागरणचे जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी, मंत्री गुलाबराव पाटील, पत्रकार विनायक परब, प्रसिद्ध हिंदी अभिनेता गुलशन गोवर यांची उपस्थिती लाभलेली आहे.