⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

एकदाच पैसे भरा अन १४ लाख मिळवा ; LIC ची भन्नाट योजना

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । आज आम्ही तुम्हाला एलआयसी(LIC) च्या अशा एक पॉलिसीबाबत सांगणार होतोत जे 10-25 वर्षांमध्ये मॅच्युरिटी होते आणि तुलनात्मक आधारावर एफडीपेक्षा चांगला परतावा देते.

बँकेतील मुदत ठेवीशी तुलना केल्यास एलआयसीची वन टाइम प्रिमिअम योजना खूप सरस ठरते. एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एलआयसीची योजना खूप फायदेशीर ठरते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही योजना तयार केली आहे.

या पॉलिसीचा टेबल नंबर ९१७ आहे. पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास किमान प्रवेश वय ९० दिवस आणि कमाल प्रवेश वय ६५ वर्षे आहे. त्याचे कमाल मॅच्युरिटी वय ७५ वर्षे आहे.  योजनेची मुदत १० ते २५ वर्षांची असते.

विशेषत: जे एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांना लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आलीय. प्रीमियम भरण्याची मुदत सिंगल प्रीमियम आहे. या पॉलिसीसह दोन प्रकारचे रायडर देखील उपलब्ध आहेत. पहिला रायडर म्हणजे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर असतो. तर दुसरा रायडर न्यू टर्म इश्युरन्स रायडर आहे. कर लाभांबद्दल बोलायडे झाल्यास प्रीमियम भरल्यावर, तुम्हाला 80C अंतर्गत करकपातीचा लाभ मिळतो.

एलआयसीच्या या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम ५० हजार इतकी आहे. तर कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही ५० हजारांच्या वर ५ हजारच्या पटीत कितीही रक्कम यात एकरकमी पद्धतीनं गुंतवणूक करू शकता.

या योजनेत मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट असे दोन्ही पर्याय उपलब्ध होतात. म्हणजेच योजनेची मुदत संपल्यानंतर लाभार्थ्याला मॅच्युरिटीचा पूर्ण लाभ मिळतो. तर मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला योजनेचा लाभ मिळतो. दुसऱ्या पर्यायाअंतर्गत विमाधारक 5, 10 किंवा 15 वर्षांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर EMI म्हणून मॅच्युरिटी रक्कम घेऊ शकतो.

आकडेवारीवर नजर टाकल्यास या योजनेतून होणाऱ्या लाभ दिसून येईल. सध्या २.४ लाख रुपये FD मध्ये जमा केले, तर २५ वर्षांनंतर ६ टक्के दराने, सुमारे १०.२० लाख रुपये आणि 7 टक्के दराने १२.९० लाख रुपये मिळतील. दुसरीकडे या पॉलिसीमध्ये २.४ लाख रुपयांच्या गुंतवणुकीत २५ वर्षांनंतर १३.६२ लाख रुपये होतात. जर २४ व्या वर्षी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला परिपक्वता झाल्यावर १२.८७ लाख मिळतील. जर तो अपघातात मृत्युमुखी पडला तर नामांकित व्यक्तीला १७.८७ लाख रुपये मिळतील.