⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

LIC च्या ‘या’ योजनेत 130 रुपये भरा अन् मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख रुपये

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । मुलांचा जन्म होताच पालक मुलाबाळांच्या भविष्यासाठी पैसे साठवू लागतात. विशेषतः मुलगी असेल तर तिच्या शिक्षणाबरोबरच लग्नासाठीही भरभक्कम तरतूद करण्याची पालकांची धडपड असते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ने एक नवीन योजना आणली आहे. त्याचे नाव एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) आहे. ही पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून मुक्त होऊ शकता. ही पॉलिसी फक्त खास मुलींच्या लग्नासाठी आणली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या पॉलिसीबद्दल.

जाणून घ्या पॉलिसीबद्दल..

तुम्हाला तुमच्या मुलीसाठी पॉलिसी घ्यायची असेल, तर तुमचे वय किमान ३० वर्षे, मुलीचे वय किमान १ वर्ष असले पाहिजे. ही पॉलिसी २५ वर्षांसाठी असली तरी प्रीमियम २२ वर्षांसाठीच भरावा लागतो. उर्वरित ३ वर्षांसाठी कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.

किती प्रीमियम भरावा लागेल?

या पॉलिसीमध्ये, तुम्हाला दररोज 130 रुपये (वार्षिक 47,450 रुपये) जमा करावे लागतात.तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही यापेक्षा कमी प्रीमियममध्ये पॉलिसी देखील घेऊ शकता. मात्र यातून मिळणारी रक्कमही कमी होणार आहे. दररोज १३० रुपये गुंतवून तुम्हाला २५ वर्षांनंतर २७ लाख रुपये मिळतील.

ही आवश्यक कागदपत्रे आहेत
या पॉलिसीसाठी फॉर्म भरण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. याशिवाय, जन्म प्रमाणपत्रासह स्वाक्षरी केलेला अर्ज आणि पहिल्या प्रीमियमसाठी धनादेश किंवा रोख रक्कम देखील द्यावी लागेल.

पॉलिसी कोण घेऊ शकते?
ही पॉलिसी २५ वर्षांच्या ऐवजी १३ वर्षांसाठी देखील घेतली जाऊ शकते. लग्नाव्यतिरिक्त हा पैसा मुलीच्या शिक्षणासाठीही वापरता येईल. एकूणच, या पॉलिसीद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि तिच्या लग्नाची चिंता करण्यापासून मुक्त होऊ शकता.

डेथ बेनिफिट देखील मिळेल
पॉलिसी घेताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी १० लाख रुपये मिळतील. जर मृत्यू सामान्य परिस्थितीत झाला असेल तर ५ लाख रुपये दिले जातील. यासोबतच कुटुंबाला मॅच्युरिटी होईपर्यंत दरवर्षी ५०,००० रुपये मिळतील. म्हणजेच मृत्यू लाभाचाही या योजनेत समावेश आहे. २५ वर्षांनंतर नॉमिनीला २७ लाख रुपये दिले जातील.

हे देखील वाचा :