जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । जसजशी थंडी वाढत आहे तसतसे नाक-कान-घसा विकाराचे रूग्णही वाढु लागले आहेत. काहींना या तीनही अवयवांशी निगडीत जुन्या व्याधींनी या काळात अधिकच त्रस्त केले आहे. अशा सर्व गरजु रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिराला सुरूवात झाली आहे. निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराच्या पहिल्याच दिवशी रूग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. उल्हास पाटील वैैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी विविध विभागांतर्गत नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नाक-कान-घसा या मानवाच्या अतिशय महत्वाच्या अवयवांशी निगडीत जुन्या आणि नव्याने उद्भवणार्या विकारांवर उपचार करण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. शिबिरासाठी नाक-कान-घसा विभागातील निष्णात आणि तज्ञ डॉक्टर हे स्वत: रूग्णांची तपासणी करीत असून गरजू रूग्णांना शस्त्रक्रिया आणि उपचाराविषयी मार्गदर्शन देखिल करीत आहेत.
शस्त्रक्रिया होणार नि:शुल्क
नाक-कान-घसा याशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळेच अनेक रूग्ण आजारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे आजार जेव्हा गंभीर स्वरूप धारण करतात तेव्हा रूग्णांची परिस्थीती ही अत्यंत चिंताजनक होते. खर्चाची हीच बाब लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात सर्वसामान्य रूग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. या योजनेंतर्गत नाक-कान-घसाशी संबंधित आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडुन नि:शुल्क उपचार केले जात आहेत. रूग्णांनी केवळ ओरीजनल आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणणे आवश्यक आहे.
यांच्याशी साधा संपर्क
नाक-कान-घसा शिबिरात ज्या गरजू रूग्णांना उपचार करून घ्यावयाचा आहे अशा सर्व रूग्णांनी अधिक माहितीसाठी रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड ९३७३३५०००९, रत्नशेखर ७०३०५७११११, दिपक ९४२२८३७७७१, दिक्षा ९६८९६८०९०१, कल्याणी ९५१९५२५३२५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या आजारांवर होतोय उपचार
नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिरात नाकातील कोंब काढणे, नाकातील वाढलेले हाड काढणे, नासुर, कानाचा पडदा बदलविणे, थायरॉईड, टॉन्सील, तोंडाचा कॅन्सर अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी विभागातील तज्ञ डॉक्टरांची टिम ही कार्यरत आहे. त्यासोबत या तज्ञांना निवासी डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. हर्षल महाजन हे देखिल सहकार्य करीत
आहे.
हे देखील वाचा :
- Ahirani Pavari Songs : झिंगी पावरीच्या अभूतपूर्व यशानंतर धुमाकूळ घालतेय ‘जळगाव खान्देशी पावरी’
- अपघातातील जखमींवर उपचार करा; पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार नाही – डॉ.प्रवीण मुंढे
- हिंदू एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदु एकता दिंडी’ !
- जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळांची ‘आदर्श’ शाळांमध्ये समावेश
- बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज