जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । राज्यातील शिवसेनेत पडलेल्या उभ्या फूटमुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे युद्ध पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर ताशेरे ओढत गुलाबराव पाटलाला पुन्हा टपरीवर बसायला लावेल असे वक्तव्य केले होते गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ गुवाहाटी येथून व्हायरल झाला असून चुना कसा लावतात हे संजय राऊतला माहिती नसून वेळ येऊ द्या त्याला चुना लावून दाखल असे खरमरीत प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हा 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहीतील बैठकीत व्यक्त करत टोला लगावलाय. यावेळी बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेत केलेल्या संघर्षाविषयी देखील सांगितलं. जेलमध्ये गेल्याची आठवण आणि 1992च्या दंगलीची आठवण देखील त्यांनी करून दिली. दरम्यान, राज्यात चाललेला सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. पहिल्यांदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : ठाकरे सरकारसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ; बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांचे पत्र
बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून बंडखोर आमदारांनी आपलं मत या बैठकीत मांडलं. यादरम्यान, शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख केला. गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,’ अशा प्रकारची नाराजी गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
पहा काय म्हणाले गुलाबराव पाटील :