उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाचे दर अचानक वधारले

मार्च 21, 2025 2:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबूच्या दरात अचानक वाढ झाली. गेल्या महिन्यात फक्त ३० ते ४० रुपये किलोवर असलेले लिंबू आता १६० ते १८० रुपयावर पोहोचले आहे. वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी यामुळे दरवाढ झाली.

lemon

जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानत मोठी वाढ झाल्यानं उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांपासून रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, हॉटेल व खानावळी चालकांच्या कडे लिंबूची मागणी प्रचंड वाढली आहे. यासोबतच सध्या रमजान महिन्याचे रोजे सुरु आहे. यामुळे देखील फळांसोबतच लिंबूची मागणी वाढली आहे.

रोजा सोडल्यानंतर बहुतांश जण लिंबू सरबत घेतात. एकीकडे लिंबूची मागणी वाढताना दुसरीकडे मात्र उत्पादन कमी असल्याने दर वाढ झाली आहे. फळांची आवक होण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागेल. सध्या बाजारात ४० ते ५० रुपये पाव लिंबूला मिळत आहेत. आगामी पंधरवड्यात ते पुन्हा वाढीचा अंदाज आहे.

लिंबाचे दर वाढल्यामुळे सरबत विक्रेत्यांना आणि हॉटेल व्यवसायांना लिंबांच्या खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. आणखी, पिकाच्या काळातच लिंबांची आवक कमी होणे हे एक मोठे कारण आहे, ज्यामुळे दर वाढले आहेत. अनेक व्यापारी व ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे की, लवकरच ही स्थिती सुधारेल की नाही. बाजारातील स्थिती यापुढे कशी बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment