जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे डी डी एस पी महाविद्यालयात आर्थिक साक्षरता या विषयावर प्रा. डॉ. गौरव महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अमित पाटील हे होते.
याप्रसंगी धरणगाव महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. गौरव महाजन यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. संदीप कोतकर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंकिता बडगुजर व कविता गावंडे यांनी केले स्वागत गीत वाणिज्य द्वितीय वर्ष वर्गाच्या विद्यार्थिनी निकिता महाजन, हर्षा पाटील, नेहा ठाकूर, जागृती पाटील यांनी सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एन. ए. पाटील उपप्राचार्य बडगुजर के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ पाटील प्राध्यापक विजय गाडे प्रा. योगेश पाटील, प्रा. मोमीन शेख, प्रा. ए.टी. चिमकर यांनी परिश्रम घेतले. जे विद्यार्थी पूर्णवेळ कॉलेज करून दुपारनंतर विविध स्वरूपाचे कामे करून अर्थाजन करतात स्वतःचा शिक्षणाचा खर्च स्वतःच्या कमाईतून करतात उर्वरित पैशांची गुंतवणूक करतात. लक्ष्मीकांत लोहार, सागर पाटील, यश कल्याणी, कृष्णा मातेरे, गायत्री महाजन, वैष्णवी चौधरी, प्रथमेश भावसार, विश्वास परदेशी, राकेश पाटील, हर्षदा चौधरी, प्रथमेश महाजन, अतुल ठाकूर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रा. अतुल पाटील यांनी केले.