जळगाव शहर
विद्यापीठात खासदार उन्मेष पाटील यांचे व्याख्यान
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत खासदार उन्मेष पाटील यांचे गुरुवारी व्याख्यान झाले. ‘यश हे बाजारात विकत मिळत नाही ते अभ्यास करून व अथक प्रयत्नांतून मिळवावे लागते. असे खा. उन्मेष पाटील मानले.
विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. असा सल्ला त्यांनी दिला. संचालक प्रा. जे. बी. नाईक हे अध्यक्षस्थानी होते. अभियांत्रिकी शिक्षणाची चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असतो. त्याचा क्षण-क्षण उपयोगात आणून ज्ञान संपादन केले पाहिजे. इतरांशी वाद करण्यापेक्षा संवाद साधावा. इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील उणिवा दूर कराव्यात असा सल्ला पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.