⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी उषा यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम

राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी उषा यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पिकर व वरीष्ठ राजयोग शिक्षीका ब्रह्माकुमारी उषा , माऊंट आबू, राजस्थान यांचे जिल्ह्यातील मोहिंदा ता. चोपडा, चोपडा शहर, एरंडोल, वाघळुद, पिंप्री ता. धरणगाव, ंकानळदा आणि जळगाव शहरात विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जीवनातील विविध प्रसंगावर आणि समस्यांवर मात करण्यासाठी प्रेरक व्याख्यान श्रृंखला आणि राजयोगाच्या सहज व सुगम भाषेत शिकवणीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषा, माऊंट आबू राजस्थान यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मोहिंदा ता. चोपडा येथे गीता की वर्तमान समय में व्यावहारिकता या विषयावर  व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 23 रोजी ब्रह्माकुमारीज् चोपडा सेवाकेंद्रात मेडिटेशन कुटीयाचे उद्घाटन आणि सकाळी 10 वाजता डॉक्टरांसाठी ईजी मेडिटेशन फॉर बीझी पिपल्स तर ब्रह्माकुमारी चोपडा सेवाकेंद्राच्या प्रांगणात संध्याकाळी 6.30 वाजता सुख शांती तथा सफलता का मूलमंत्र या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. 24 एप्रिल रोजी एरंडोल येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या आत्मानुभूती सेवाकेंद्राचे उदघाटन सकाळी 8 वाजता तर काबरे विद्यालयांच्या प्रांगणात संध्याकाळी 6.30 वाजता समय की पुकार सकारात्मक जीवनशैली या विषयावर व्याखान आयोजित होईल.  

सोमवार दि. 25 रोजी सकाळी 9 वाजता ब्रह्माकुमारीज् धरणगांव येथे राजयोग व्याख्यान, संध्याकाळी 5 वाजता वाघळुद आणि पिंप्री येथे भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 9 वाजता कानळदा येथे ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र दिव्य प्रकाश भवनचे उदघाटन व कर्म की गुह्यगती विषयावर व्याख्यान तसेच संध्याकाळी 6.30 वाजता जळगाव येथील कांताई सभागृहात जीवन में सुख को एक अवसर दो या विषयावर व्याख्यानाचे आयोज करण्यात आले आहे.

तरी जिल्हायातील सर्व नागरीकांनी राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषादीदींजीच्या विविध प्रेरक व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षी, ब्रह्माकुमारी मंगला, ब्रह्माकुमारी निता, ब्रह्माकुमारी पुष्पा, ब्रह्माकुमारी सिमा दीदी, ब्रह्माकुमारी पूजा , ब्र.कु. रवींद्र पाटील आणि डॉ. सोमनाथ वडनेरे, डॉ अंकुश कोलते, धीरज सोनी यांनी केले आहे.  

author avatar
टीम जळगाव लाईव्ह