जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । जळगाव शहरात घरफोडी, मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकींची चोरी करणाऱ्या चिल्याला एलसीबीच्या पथकाने शिवाजीनगर हुडको परिसरातून एलसीबीच्या पथकाने सोमवारी अटक केली आहे. संशयित ३ बालकांच्या मदतीने ७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
जळगाव शहरात गेल्या महिनाभरात मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत होती. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एक स्वतंत्र पथक तयार केले होते. पथकात सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, अशोक महाजन संदीप सावळे, पोलीस नाईक अविनाश देवरे, रवींद्र पाटील, दीपक शिंदे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, सहायक फौजदार राजेंद्र पवार यांचा समावेश होता.
संशयित आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्ल्या रा. शिवाजी नगर, हुडको जळगाव हा शहरातील चोरी करत असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने सोमवार दि.१४ मार्च रोजी दुपारी शिताफीने कारवाई करत संशयित आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या याला शिवाजी नगरातून दुपारी अटक केली.
तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने त्याने शहरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. संशयित युसूफ शेख उर्फ चिल्या शेख याने मोबाईल स्नॅचिंग -२, घरफोडी-२ आणि दुचाकी चोरीचे -३ असे एकुण ७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याबाबत पुढील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत आहे.