जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भुसावळ रेल्वे प्रशासन पाचोरा ते जामनेर (पीजे) ही ऐतिहासिक नॅरो गेज पॅसेंजर गाडी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, पीजे बचाव कृती समिती हा प्रयत्न हाणून पाडेल. ही गाडी पूर्वीप्रमाणे तातडीने सुरू करावी, अशी मागणी भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून पाचोरा-जामनेर पॅसेंजर गाडी बंद केली आहे. आता कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. तरीही पीजे रेल्वे सुरू झालेली नाही. तसे प्रयत्न देखील रेल्वे प्रशासनाकडून होताना दिसत नाही. उलट पाचोरा- जामनेर रेल्वे मार्गावरील सर्व सुविधा कायमस्वरुपी बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे रूळ काढण्याचे काम देखील सुरू होईल, अशी चर्चा आहे. म्हणजेच पीजे गाडी बंद करण्याच्या हालचाली आहे. त्यासाठी डिझेल पंप बंद करणे, पाचोरा-जामनेर मार्गावरील वरखेडी, पिंपळगाव, पहूर, शेंदुर्णी, भागदरा, जामनेर या स्थानकावरील कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली केल्याचा आरोप कृती समितीने केला.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, खजिनदार पप्पू राजपूत, सदस्य प्रताप पाटील, अरुण पाटील, देविदास पाटील, सचिन जाधव, सुधाकर सोनवणे उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात