⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

कोण म्हणतंय तरुणांना कोरोनाचा त्रास होत नाहीये? जळगावात गेल्या ३० दिवसात १६ तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावात कोरोनाची लक्षण असून अंगावर काढण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे. यामुळे पहिल्या ७२ तासातच ७५% रुग्णांचा मृत्यू होत आहे.लक्षण दिसून देखील मी वय कमी आहे तर काही होणार नाही असा अभिर्भाव अनेकांचा दिसून येत आहे. परंतु समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा दावा खोटा ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील ३० दिवसात १६ तरुणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ४० वर्षांआतील व्यक्तींच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या ३० दिवसांत अशा १६ रुणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तरुणांमध्ये कोरोना संसर्गाबाबत असणाऱ्या बेफिकिरीमुळे हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. कोरोनाने जिल्ह्यातील १६११ नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यात ४० वर्षांच्या आत वय असलेले ७३ जण आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण पहिल्या लाटेच्या ११ महिन्यांत मरण पावले. मार्च २०२१च्या अवघ्या ३० दिवसांतच अशा कमी वयाच्या तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्याच्या ३० दिवसांत २२६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यात १६ जण हे ४० वर्षांआतील होते. एक तर दोन वर्षांचीच बालिका होती. ८ मार्चला २२ आणि ३६ वर्षीय तरुण, ९ मार्चला ४० वर्षीय महिला, १२ मार्चला ३० वर्षीय तरुण, १९ मार्चला ४० वर्षीय महिला, २० मार्चला ३८ वर्षीय पुरुष, २४ मार्चला २० वर्षीय तरुणी आणि ३५ वर्षीय तरुण, २५ मार्चला ३५ वर्षीय तरुण, २६ तारखेला पुन्हा ३५ वर्षीय तरुण, २७ मार्चला २८ वर्षीय महिला, २८ मार्चला दोन वर्षीय बालिका आणि ३३ वर्षीय तरुण, २९ मार्चला ४० वर्षीय इसम आणि ३० मार्च राेजी ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती आजच्या दैनिक दिव्यमराठीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.