⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | विजेचा तार तुटुन पडल्याने भीषण आग, पाईप लाईन जाळल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

विजेचा तार तुटुन पडल्याने भीषण आग, पाईप लाईन जाळल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । सध्या वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटना वाढत असतानाचे दिसून येतंय. अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव या गावातील नाल्यालगत विजेचा तार तुटुन पडल्याने त्याचे रुपांतर आगीत झाले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात आग लागल्याची घटना घडलीय. दरम्यान, गावकर्‍यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

तसेच महसुल व पोलीस प्रशासन यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली.हि आग फक्त वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे लागली असे गावातील नागरीक उघडपणे बोलत आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीच्या वेळेस पाईप लाईन जाळल्या गेल्या असून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

घटना स्थळी तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीदार झांबरे व पोलीस प्रशासनाचे पो.का. संतोष चौधरी, पो.का गजमल पाटील वरणगाव येथील अंग्नीशामक दलाचे मधुकर पाटील, मनोज चौधरी, विलास शेळके, योगेश भोई, वरणगाव यांनी आग विझवण्यात सहकार्य केले.तसेच गावचे पोलीस पाटील देशमाने सरपंच उपसरपंच व शिवसेना कार्यकर्ते भागवत कोळी यांनी सहकार्य केले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.