Bhusawal : लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात सापडले मोठे घबाड

नोव्हेंबर 30, 2024 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच स्विकारणाऱ्या राज्य उत्पादक शुल्क भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे हे अद्यापही पसार आहे. न्यायालयाकडून त्यांच्या घराचे सर्च वॉरंट घेत चित्रीकरणासह घर झडती घेतली. यावेळी लाचलुचपत विभागाला तब्बल ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याची माहिती जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकातून कळविले आहे.

crime 2 jpg webp

काय आहे प्रकरण?
दारूबंदीचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे व खासगी पंटर किरण माधव सूर्यवंशी यांनी २३ नोव्हेंबरला ३० हजाराची लाच घेतांना त्यांना पकडले. त्यांनी अवैध दारूचा साठा पकडला होता, त्या बदल्यात गुन्हा दाखल न करण्याचे व त्रास न देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराची लाच घेतली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांना आपण सापळ्यात अडकलो आहे, हे लक्षात येताच ते पसार झाला.त्यानुसार लाचलुचपत विभागाने विशेष न्यायालय भुसावळ यांच्या परवानगीने सर्च वॉरंटच्या माध्यमातून दोन पंच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफर कॅमेराजसह संशयित आरोपी राजकिरण सोनवणे यांच्या घराची झडती घेतली.

घरात आढळला ४१ लाखांचा मुद्देमाल :
या झडतीत सोनवणे यांच्या घरातून १ लाख ४९ हजार २९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, अडीच हजार रूपये किंतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, बुलेट मोटरसायकल, कारचे पेपर्स, दीड लाखांचे सोन्या चांदीचे दागिने, पिस्तूलाच्या १० रिकाम्या पुंगळ्या, १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड, तसेच १७ लाख ९० हजार रुपयांचे सोने-चांदी खरेदी केलेल्या मूळ पावत्या आणि टीव्ही फ्रिज एसी व इतर साहित्य असा एकूण ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई नाशिक येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे, अशी माहिती जळगाव येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now