धरणगाव येथे दुकानातून सव्वा लाख रुपयांचे साहित्य लंपास

एप्रिल 7, 2022 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । धरणगाव शहरातील चोपडा रोडवरील दुकानातून चोरट्यांनी सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मधुकर झिपरू मिस्तरी यांचे चोपडा रस्त्यावरील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी वेल्डिंग मशीन, रसवंती मशिन, इलेक्ट्रिक मोटार, वायर बंडल, मोटार स्विच, वेल्डिंग रॉड आदी साहित्य चोरून नेले.

crime 16 jpg webp

४ एप्रिलला मधुकर मिस्तरी हे सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानावर गेल्यावर दुकानाचे शटरचे उघडे होते. आत गेल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात धरणगाव पोलिस स्थानकात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत दुकानदाराकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी पोलिस हेड कान्स्टेबल विनोद संदानशिव उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now