जळगाव शहर
कौशिकी भारतगॅसतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । शहरातील प्रतिथयश कौशिकी भारतगॅसच्या वतीने आज स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त श्रमदान तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भारत सरकारच्या वतीने १ जुलै ते १५ जुलै २०२२ दरम्यान स्वच्छता पंधरवाडा अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त येथील कौशिकी भारतगॅस आणि जळगाव विभाग एलपीजी तर्फे का. ऊ. कोल्हे शाळेत श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी भारत गॅसचे सेल्स अधिकारी पवन भारती, कौशिकी भारत गॅसचे संचालक सौरभ चौबे यांच्यासह जळगाव विभाग एलपीजीचे सर्व सहकारी बंधू उपस्थित होते.