कर्जाच्या विवंचनेतुन कुसुंबाच्या शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल

सप्टेंबर 5, 2022 2:26 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील ६६ वर्षीय शेतकर्‍याने सोल्यूशन प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना काल रविवार, रोजी उघडकीस आली. आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसले तरी शेतकर्‍यावर झालेल्या पाच लाखांच्या कर्ज विवंचनेत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत रावेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

crime murder

सुधीर राजाराम जावळे (वय ६६) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. जावळे हे शनिवारपासून घरच्यांना काहीही न सांगता निघून गेले होते. मुलांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळला. शेतकर्‍याने सोल्यूशन प्राशन करीत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतकर्‍याकडे साडे सहा एकर शेती असून त्यात केळी लागवड करण्यात आली असून पाच लाखाचे कर्ज असल्याचे त्यांचा मुलगा राहुल जावळे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now