---Advertisement---
मुक्ताईनगर राजकारण

मुक्ताईनगरात भाजप- शिंदे गटाला दणका ! बड्या ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंचे पॅनलने मारली बाजी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । राज्यातल्या ३४ जिल्ह्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्यातील १०० हुन अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीमध्ये शिंदे – भाजप गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक पॅनल विजयी झाले आहे. निवडणूकीत १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहे.

eknatha khadse

कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कारण माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत असल्याने ही अतिशय चुरशीची मानली जाणारी निवडणूक होती. यात १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक व राष्ट्रवादीचे एकुण १७ जागापैकी १३ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. तर प्रतिस्पर्धी भाजपा आणि शिंदे गटाचे ४ उमेदवार निवडून आले आहे.

---Advertisement---

सरपंच पदासाठी खडसे समर्थक डॉ. बी.सी. महाजन हे मोठ्या मतांनी सरपंचपदी निवडून आले आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपा शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव झाला आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वीच जळगाव दूध महासंघाची निवडणूक पार पडली त्यात भाजपची सरशी झाली होती. त्यामुळे आजच्या या ग्रामपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपा, शिंदे गटाला धक्का देत एकनाथ खडसेंनी गड कायम राखला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---