कोहलीच्या ‘विराट’ खेळीने पाकिस्तानला चारली धूळ ; भारताने शेवटच्या चेंडूवर हरलेली बाजी जिंकली
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । T20 वल्ड कपमध्ये टीम इंडियाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. कोहलीच्या ‘विराट’ खेळीपुढे पाकिस्तानला धूळ चारली. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी भारताला 160 धावांचे लक्ष दिले गेले होता. सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली, ज्यामुळे पाकिस्तानला केवळ 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी गोलंदाजीमध्ये खूप प्रभावी ठरले.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच विश्वचषकात प्रवेश करत आहे. गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत आता मेलबर्नमध्ये बाबर आझमच्या या फौजेची धुलाई करून टीम इंडिया आपला बदला पूर्ण करू इच्छित आहे. टीम इंडियाने 15 वर्षांपासून एकही टी-20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही, त्यामुळे हे स्वप्नही पूर्ण करणे आवश्यक आहे.