⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

ज्ञान, गरिबी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बेरोजगारी हे आपले शत्रू आहेत – आ. मंगेश चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । ३०० वर्षांची हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणारी उरुसाची परंपरा आपल्या चाळीसगाव शहराला असून ज्याला देशभरातून नागरिक येतात आणि आपल्या एकीचा संदेश घेऊन जातात. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या नागरिकांचे सण – उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. दिवाळीला सर्व तालुक्यात मी मिठाई वाटप करून तोंड गोड केले त्याचप्रमाणे आज मुस्लीम बांधवांसाठी “ईद मिलन” कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रत्येक धर्मात, समाजात काही वाईट प्रवृत्ती असतात. वाईट प्रवृत्तीला उत्तर द्यायचे असेल तर चांगल्या प्रवृत्तींना एकत्र आणणे गरजेचे आहे. आज चाळीसगाव शहरातील मुस्लीम समाजाने आपला शत्रू कोण आहे ? आपण कुणाविरुद्ध लढले पाहिजे ? इतक्या वर्षातही आपल्या परिसराचा, मोहल्ल्यांचा विकास का झाला नाही ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

समाजातील अज्ञान, गरिबी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बेरोजगारी हे आपले शत्रू आहेत, त्यांच्याविरुद्ध आपण लढले पाहिजे असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते चाळीसगाव येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश स्मारकाच्या साक्षीने व हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या पीर मुसा कादरी बाबांच्या या भूमीत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी सर्व हिंदू मुस्लीम बांधवांसाठी “ईद मिलन कार्यक्रम” दि.७ मे रोजी आयोजित केला होता.

त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंग, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, भाजपा जेष्ठ नेते लालचंद काका बजाज, औरंगाबाद हून आलेले अत्तारसाहेब, धुळे येथील माजी नगरसेवक फिरोजभाई लाला, मालेगाव येथील माजी नगरसेवक इजाजभाई, कन्नड येथील जावेदभाई, लतीफ पहेलवान, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, शेषराव बापू पाटील, प्रेमचंद भाऊ खिवसरा, धर्मा आबा वाघ, रविंद्र आबा पाटील, सुधीर आबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम , शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पोपट भोळे, भाऊ जाधव, अनिल नागरे, अलाद्दीन भाई, हाजी आरिफ, शकील हाजी, संजू पाटील, संजू पाटील, राजू चौधरी, राजू राठोड, सरदार राजपूत, आण्णा विसपुते, आण्णा पैलवान, अनिल नागरे, सोमसिंग आबा राजपूत, आनंद जी खरात, रिजवाना ताई, चिराग शेख, यास्मिनताई फकीरा बेग, योगेश भाऊ अग्रवाल, नितिन पाटील, बापू अहिरे, प्रकाश पवार , विजया पवार, विवेक चौधरी, नितीन पाटील पाटणा, असिफ खाटीक, धनंजय मांडोळे आप्पा, अखलाक भाई खाटिक, अग्गाभाई सय्यद, अकिल मेम्बर, इम्रान मेम्बर, मंजूर हाजी, नदीमभाई, अल्लाउद्दीन, आयास पठाण, लियाकत पठाण, राजू किंग यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील हिंदू – मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते फुल हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित हिंदू – मुस्लीम बांधवांसाठी शीर खुर्मा व स्नेहभोजनाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती.

गावात शांतता आणि सौहार्द असल तर गावाचा विकास देखील वेगाने होतो, एकमेकांच्या धर्माचा आदर केला तरच एकी टिकून राहील. समाजातील वाईट प्रवृत्ती मग त्या कुठल्याही धर्माच्या असल्या तरी त्या घातकच असतात. त्यांना पाठीशी घालणार नाही असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

७० वर्षांपासून प्रलंबित मुस्लीम समाज कब्रस्थानाचा विषय मार्गी लावणारे आमदार मंगेश चव्हाण यांना मुस्लीम समाजाने  साथ द्यावी – धुळे येथील माजी नगरसेवक फिरोज लाला यांचे आवाहन

गरीब असो वा श्रीमंत असो सर्वाना एक दिवस कब्रस्थान मध्येच जावे लागते मात्र चाळीसगाव शहरात पीर मुसा कादरी बाबा यांच्या दर्गा मागील कब्रस्तानचा प्रश्न गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित होता. इतक्या वर्षात अनेक आमदार आले, अनेक सरकार आले पण कुणालाही हा विषय सोडवता आला नाही. कारण हे पुण्याचे काम फक्त आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नशिबात होते. त्यांनी कब्रस्थान साठी ८ एकर जागा तर मिळवून तर दिलीच परंतु स्वखर्चाने तार कंपाऊंड देखील करून दिले. दुसऱ्या धर्माचा माणूस जर आपल्यासाठी एव्हडे करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे, त्याला साथ देण्याचे काम सर्व चाळीसगाव तालुक्यातील मुस्लीम समाजाने करावे असे आवाहन धुळे येथील माजी नगरसेवक फिरोज लाला यांनी केले.

सदर ईद मिलन प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनीदेखील उपस्थितांशी संवाद साधत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने शहर वासियांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. जामदा येथील खाटिक सर, अल्लाउद्दीन भाई, अयास पठाण यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसर खाटीक सर यांनी केले. अग्गा भाई सय्यद यांनी आभार मानले.