जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा गावातील युवकाला नाचण्याच्या कारणावरून चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न २८ डिसेंबरला झाला होता. जखमी तरुणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे चारही संशयितांवर खुनाचे कलम वाढविले आहे.
बांभोरी येथील संशयित विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे आणि अजय नन्नवरे या चौघांनी अतुल कोळीला (वय २५) मारहाण केली होती. तसेच संशयित अजय नन्नवरे याने चाकूने अतुलच्या पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अतुल कोळी याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पाचव्या दिवशी अतुलचा मृत्यू झाल्याने खुनाचे कलम वाढले.
हे देखील वाचा :
- धक्कादायक : विवाहितेचे अपहरण करुन ठेवले डांबून
- सखाराम महाराजांच्या यात्रेला आलेल्या महिलेची मंगलपोत लांबविली
- हृदयद्रावक : एकाच चितेवर दिला ५ मृतदेहांना अग्निडाग, मृतदेह ओळखणे शक्य नसल्याने घेतला निर्णय
- ४८ वर्षीय महिलेवर जडले प्रेम, लग्नासाठी केली मागणी आणि पुढे घडले असे की…
- अजब प्रकार : वाहनातील बॅटरीसह २० लिटर डिझेलची झाली चोरी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज