माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । जळगाव महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे, विश्वस्त कैलास माळी, जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी यांच्या हस्ते देण्यात आले.
किशोर माळी यांची सामाजिक, राजकीय, व्यवसायिक क्षेत्रात काम करत असताना आरोग्य सेवा, शैक्षणिक क्षेत्र, नगर पालिका, पोलीस स्टेशन, पंचायत समिती अशा विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली. खूप कमी वयापासूनच त्यांना समाज सेवेची आवड असल्याकारणाने सर्वांच्या सुखदुःखात कामी येत असतात तसेच त्यांचा मित्र संग्रह अफाट आहे. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्व आज माळी महासंघा माध्यमातून न्याय मिळाला, यावेळी किशोर माळी यांनी मिळालेल्या संधी चे सोने करेल असे सांगत निवडी बद्दल व सर्व मान्यवरांच्या आशीर्वाद व आभार मानले. या निवडीबद्दल माळी समाज, यावल तालुका, शहर, शिवरत्न फाउंडेशन यावल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यावल, तेजस्विनी दुर्गा उत्सव मंडळ यावल, एकदंत गणेश मंडळ यावल व समाजातील तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात.