महाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्यांचा आता ‘या’ माजी मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका बड्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेले आरोप हे थेट 200 कोटी रुपयांचे आहेत. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ज्या ज्या बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांचं भ्रष्टाचारांच्या आरोपांचं हत्यार आता नव्या मंत्र्यावर किती घाव घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

राज्यात 2019 च्या विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर काही दिवसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या मैदानात आले. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. अनेक मंत्र्यांवर टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या विविध आरोप आणि दाव्यानंतर ईडीने संबंधित नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापा टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले. अनेकांच्या पाठिमागे चौकशीचा ससेमिरा लागला.

शिवसेना खासदार संजय राऊत, माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचे वारंवार आरोप करत आहेत. आता हेही असे की थोडके आता त्यांनी आणखी एका माजी मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहे. या मंत्र्याने 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण संबंधित ठिकाणी सोमय्या हे स्वत: जावून पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button