जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । पाचोरा शहरातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता गल्लीतील गणेश पाटील या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. परंतु मुलगी कुठेही मिळून आले नाही, अखेर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गणेश पाटील या मुलाविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.