⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | खिर्डीला शांतता समितीची बैठक, गणेशोत्सव शांततेत साजरा करा : सपोनि.गणेश धुमाळ

खिर्डीला शांतता समितीची बैठक, गणेशोत्सव शांततेत साजरा करा : सपोनि.गणेश धुमाळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत येथे निंभोरा पोलीस प्रशासनतर्फे पोळा व गणेशोत्सवनिमित्त नि.पो.स्टे.चे सपोनि.गणेशजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती ची बैठक घेण्यात आली. दरम्यान, पोळा व गणेश उत्सव कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.

पोलीस प्रशासनातर्फे बैठकीत सपोनि धुमाळ हे उपस्थित होते. धुमाळ म्हणाले की, कोरोना महामारीच्या तब्ब्ल २वर्षाच्या काळानंतर यंदा सण साजरे होत असून गावाची परंपरा कायम राखत या काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता, गालबोट न लागता, कोणाच्याही धार्मिक भावना दुखणावर नाही हे लक्षात घेत, मोठया उत्साहात उस्तव साजरे करा. याप्रसंगी पोलीस पाटील प्रदीप पाटील, अरुण पाटील, सरपंच डॉ. राहुल फालक, ग्रामविकास अधिकारी संजीव पाटील, घनश्याम पाटील, ग्रा.सदस्य विनोद पाटील, पंकज राणे,ऍड. चंद्रजित पाटील,डॉ. मुरलीधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे,पोहेको. ज्ञानेश्वर पाटील, कर्मचारी दिगंबर तावडे, राहुल कोळी त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह