⁠ 
रविवार, मे 19, 2024

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जुलै २०२१ । रावेर प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील खिर्डी येथे मुक्ताईनगर मतदार संघातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या उपस्थतीत धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी खिर्डी येथे मुक्ताईनगर मतदारसंघातील १७ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

याना मिळाला लाभ
या मध्ये उषाबाई अशोक कोळी(निंभोरा बुद्रुक), अनिता कैलास कापसे (महाजन) वाघोदा बुद्रुक, उर्मिला अरुण नेमाडे(सवदा), सविता मुकेश अवसरमल,(ऐनपूर), सुशिलाबाई शांताराम मोंढाळे(सुनोदा), सिंधुबाई मधुकर तायडे(गाते), मायाबाई दिलीप तायडे(गाते), हनिफाबी शब्बीर पिंजारी(सावदा), मंगलाबाई भगवान वानखेडे (विटवा), पपिलाबाई मुरलीधर पाटील(तांदलवाडी), लक्ष्माबाई श्रीराम गायकवाड(लूमखेडे), सुनिता चंद्रकांत पाटील(गाते) शोभाबाई जगन्नाथ चौधरी(सुनोदा), मालती किरण फेगडे(सावदा), सुशिला लक्ष्मण तायडे(गाते), नंदा भागवत सैतवाल(खिर्डी खुर्द), राधीका राजेश मालखेडे(खिर्डी बुद्रुक) यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी खिर्डी मंडळाधिकारी मिना तडवी, खिर्डी तलाठी एफ.एस.खान, निलेश पाटील तलाठी बलवाडी, कीर्ती कदम तलाठी निंबोल, शाम तिवाड़े,तलाठी कांडवेल, नायब तहसीलदार जी.एन.सेलकर, संजय गांधी लिपिक संजय मोहिते, खिर्डी बुद्रुक सरपंच किरण कोळी, खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन व गोकुळ सोनवणे,शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री गोपाळ सोनवणे, छोटू पाटील, घमा पाटील,निळू पाटील, अमोल पाटील, विनोद पाटील, गुणवंत पाटील, साबीर बेग, अलताफ बेग, नितीन पाटील, शेख सलमान, राहुल कोळी, ग्राम पंचायत कर्मचारी आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.