दीपक वाल्हे यांना खान्देश भुषण पुरस्कार जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । डेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष दीपक उखर्डू वाल्हे यांना आदिलशाह फारूकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘खान्देश भुषण पुरस्कार २०२०-२१ जाहीर करण्यात आला आहे. जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते दीपक वाल्हे यांनी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाची जनजागृती करून लग्न सोहळा व इतर समारंभातील पारंपरिक गाण्यांचे संकलन करुन १५०० पुस्तके हौशी कलावंत, नागरिकांना मोफत वाटप केले आहेत. धार्मिक कथा कांदबरी व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक असलेले ग्रंथालय देखील त्यांनी सुरु केले आहे. उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन देणे, पानखिडकी भागातील दुर्गा देवी ते गणपती मंदिर परिसरात निघणाऱ्या धार्मिक मिरवणूक, शोत्रायात्रा, पालखी सोहळ्यासाठी स्वखर्चाने रांगोळ्या काढणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करणे यासह कोरोनाकाळात लॉंड्री व्यावसायिक व इतर नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्या गोळ्या, औषधी वाटप करून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवाचा सत्कार, शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार यासारखे कार्य त्यांनी केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.