शिंदे गटाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर, निलेश पाटील, सरिता माळी यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । राज्यात झालेल्या सत्तांतरानंर शिवसेनेत फूट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. तब्बल सात महिन्यांनी शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्याची कार्यकारणी तयार झाली आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी हि नियुक्ती केली आहे.

शिंदे गटाच्या जळगाव ग्रामीण व जळगाव शहर जिल्हाप्रमुखपदी निलेश पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव विधानसभा शहर संघटक म्हणून श्याम कोगटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंदन काळे व गणेश सोनवणे हे जळगाव शहर प्रमुख असणार आहेत. तर ऍड.दिलीप पोकळे, मनोज चौधरी, गिरीश कोळी, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे हे जळगाव उपशहर प्रमुख असणार आहेत.

डॉक्टर खुशाल जावळे यांची वैद्यकीय आघाडी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून जितेंद्र गवळी हे श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख असणार आहेत. महिला जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सरिता माळी कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शोभा चौधरी आणि ज्योती शिवदे जळगाव शहर प्रमुख असणार आहेत.