पिंक ऑटो गटाच्या १५ महिलांची होणार नवी प्रगती

जून 29, 2022 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । कष्टकरी, गोरगरीब महिला ऑटो रिक्षा चालवून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. परंतु, त्यांना आर्थिक सहाय्याची गरज असते. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनने तर्फे पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या तब्बल १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले. यामुळे या महिलांचा जीवनमार्ग सोपा झाला असून त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.

jalgaon 13

हा कार्यक्रम ज्योती जैन, संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे सचिव विजय वाणी यांच्या उपस्थितीत छोटेखानी गांधी तीर्थला पार पडला. गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली.

१५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अतुल शक्ती ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी सौजन्य केले. या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी देखील पैसे नाहीत ती अडचण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आली त्यानुसार त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now