⁠ 
रविवार, मे 19, 2024

‘खाकी’ची मदत पोहचली चाळीसगावात, पुरग्रस्तांना आधार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव येथे तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे व त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तेथील परिस्थिती पाहून मदतीसाठी पुढाकार घेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीबाबत सूचना केल्या. जळगाव उपविभागाकडून मंगळवारी सायंकाळी पाच टन साहित्य घेऊन पोलीस वाहन रवाना झाले.

पूरग्रस्तांसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पाणी बॉटल १०० खोके, १५० ब्लॅकेट, ५०० चटणी पाकिटे, चिवड्याची १४० पाकिटे, चिक्की २००, मास्क १००, मॅट २००, साड्या ५५, साडे चार हजार बिस्कीट पुडे यासह जेवणाची १ हजार पाकिटे यांचा समावेश आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी हिरवी झेंडी दाखवत ट्रक रवाना केला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.