खडसे-महाजन-पाटील एकत्र येणार : जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलसाठी आज बैठक

ऑगस्ट 30, 2021 9:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । जिल्हा बँकेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय खलबते सुरू झाली असून निवडणूक बिनविरोधसाठी सर्वपक्षीय पैनल तयार करण्याबाबत आज दुपारी ४ वाजता अजिंठा विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

girish mahajan eknath khadse

या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, या बैठकीस माजी मंत्री एकनाथराव खडसे व आ.गिरीश महाजन हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. गेल्या पंचवार्षिक प्रमाणेच यंदाही ही निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. मात्र, जागा वाटपावरून अजूनही कोणताही ठाम निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. जागावाटपावर निर्णय घेण्यात यावा यासाठीच पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन माजी मंत्री एकनाथ खडसे, आ.गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीचे निमंत्रण नेमके कुणाला मिळाले आणि बैठकीला कोण उपस्थित राहणार हे अद्याप निश्चित नसून दुपारी होणाऱ्या बैठकीतच काय ते समोर येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now