⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

खडसे ६०% अपंग आहेत त्यामुळे त्यांना ऐकू आलं नसेल – आ चंद्रकांत पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ सप्टेंबर २०२२ | खडसेंकडे 60 टक्के अपंग असल्याचं प्रमाणपत्र आहे. यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा ऐकू आल्या नसतील. अशा शब्दात मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर टीका केली. यावेळी एकनाथराव खडसे यांच्यावर टीका करताना आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगर मध्ये येऊन सेमव्ही, गोदाई कॉम्प्लेक्स, एमआयडीसी अशा खूप घोषणा केल्या. मात्र, खडसेंकडे 60 टक्के अपंग असल्याचं प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना या घोषणा ऐकू आल्या नसतील.

याचबरोबर गेल्या 30 वर्षापासून एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगरचे आमदार होते तीस वर्षात मुक्ताईनगरचा त्यांना विकास करता आला नाही मात्र गेल्या अडीच महिन्यात आम्ही काय विकास केला असा प्रश्न ते मला विचारत आहेत. मुक्ताईनगरचे नामांतर करणे म्हणजे मतदारावर उपकार केले असे नाही. खडसेंना इतके वर्ष ज्या मतदाराने निवडून दिलं त्यांच्यासाठीच खडसेंनी मुक्ताईनगर चे नामांतर केलं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

याचबरोबर एकनाथराव खडसे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत माझ्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, गरळ ओकणं हा खडसेंचा दृष्टिकोन आहे. यावर मी काहीही बोलू इच्छित नाही. मुक्ताईनगर मध्ये झालेली गर्दी ही खोक्यांची गर्दी होती अस जरी खडसेंना वाटत असेल तर खडसेंच आयुष्य खोक्यात गेलं म्हणून त्यांना खोकेच दिसतात. असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले