जळगाव जिल्हाजळगाव शहर
केसीई शिक्षणशास्त्र आंतर महाविद्यालयीन रग्बी फुटबॉल (पू) स्पर्धेत विजयी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन रग्बी फुटबॉल स्पर्धा ह्या व्ही.एस.नाईक कॉलेज रावेर येथे पार पडल्या. त्यात केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने अंतिम लढतीत सुरेख खेळाचे प्रदर्शन करीत व्ही.एस.नाईक कॉलेज रावेर संघाचा 20-10 ने पराभव करीत जेतेपद पटकाविले.
विजयी संघात परीक्षित बोरसे, कुणाल भट, रितेश सोनवणे, अमोल पवार,जितेंद्र वानखेडे, गिरीश खोडके, राहुल देवरे यांचा समावेश होता. संघास प्रा. अतुल गोरडे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या विजयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीपकुमार केदार, प्रा.प्रविण कोल्हे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.