जळगावकरांचा ‘चायना बॉयकॉट’ : स्वदेशीलाच पसंती

ऑक्टोबर 18, 2022 4:22 PM

जळगाव लाईव्ह न्युज । १८ ऑक्टोबर २०२२ । सर्वांचा आवडता सण असलेला दिवाळी सण आता आठवड्यावर आला आहे. यामुळे आता दिवाळीची खरेदी सुरु झाली आहे. आता लायटिंग आणि फटाके विकत घ्यायला देखील सुरुवात झाली आहे. मात्र, यात आनांदाची बातमी म्हणजे जळगावकरांनी आता चायनाच्या वस्तूंना बॉयकॉट केले असून स्वदेशी मालाला पसंती दिली आहे.

fatake and lighting 1 1 jpg webp

दिवाळीत जळगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा १०० टक्के ताबा होता. मात्र, आता जळगावकरांनी चीनच्या मक्तेदारीला मोठ्या प्रमाणात मोडीत काढले आहे. याच बरोबर मेड इन इंडिया लायटिंग आणि फटाक्यांना पसंती मिळत आहेत.

यंदा डिझायनर (जॉय) लायटिंगची मागणी अधिक आहे. याचबरोबर फटाके जळगाव शहरातील नागरिक फटाक्यांच्या खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना फटाके घेण्यात नेहमीच उत्साह असतो. यंदा लाइटिंग सोबत फटाके देखील मोठ्या प्रमाणावर विकत घेतले जात आहेत. सुरसुरी, छोटे लवंगी फटाके, पाऊस असे कित्येक फटाके विकत घेतले जात आहेत. यातच सर्वांचे मागणे एकच आहे ते म्हणजे फटाके हे स्वदेशी हवेत.यामुळे नागरिकांनी

सध्या जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके खरेदी विक्री केले जात आहे. या खरेदी-विक्रीमुळे सध्या पाहायला गेलो तर जळगाव शहरात चिनी फटाके नामशेष झाले आहेत. नागरिक स्वदेशी फटाक्यांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर आम्ही देखील फक्त स्वदेशी फटाकेच विकत आहोत.
व्यावसायिक
शिफा ट्रेडर्स जळगाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now