---Advertisement---
एरंडोल

कासोदा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपोषणास दुसऱ्या दिवशी वाढता पाठिंबा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कासोदा येथे अकरा कोटी रुपये खर्च होऊनही दूषित पाणीपुरवठा होत आहे. गावाला शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा होत नाही म्हणून येथील ग्रामपंचायतचे सदस्य मुश्रीफ पठाण व अरसद अली हे तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहे, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळाला.

jalgaon 2022 09 28T195402.056 jpg webp

माजी मंत्री तथा आमदार डॉ. सतीश राव पाटील यांनी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दर्शविला तसेच त्यांनी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून चर्चा केली व सदर पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार केली. शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील व महानंदाताई पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---