जळगावात ‘जॉग्स’ सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील, तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील!

जुलै 13, 2026 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव ऑब्सटेट्रीक्स अ‍ॅन्ड गायनेकॉलोजी अर्थात जॉग्स सोसायटीचा पदग्रहण समारंभ हॉटेल प्रेसिडेंट येथे मोठ्या थाटात पार पडला. या सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

jogs society

जागतिक स्तरावर मातामृत्यू कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या जपायगो आणि फॉग्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले होेते. समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या समारंभात सन २०२६-२७ साठी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली.

New Project 4 1

डॉ. संदीपकुमार पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिवपदी डॉ. शलाका पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमात अ‍ॅडव्हान्सींग ग्लोबल स्ट्रॅटेजाईज फॉर मॅटर्नल डेथ प्रिव्हेंशन या विषयावरील वैद्यकीय शिक्षणांसंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा, जळगाव आयएमएचे सचिव डॉ. पंकज शहा, जळगाव स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या माजी अध्यक्षा डॉ. वैशाली चौधरी, माजी सचिव डॉ. अनिता बाविस्कर, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुधीर नारखेडे, डॉ. सुमन लोढा, डॉ. सुजाता महाजन, डॉ. रश्मी केळकर, डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. गडप्पा यांनी “जळगाव शून्य पीपीएच मातृमृत्यूकडे वाटचाल” या संकल्पनेला बळ देणारे खपींशीपरश्र खश्रळरल ङळसरींळेप या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून प्रसूतीनंतर होणार्‍या अतिरक्तस्रावाच्या (पीपीएच) व्यवस्थापनासाठी या शस्त्रक्रियेचे महत्त्व आणि मातृमृत्यू कमी करण्यातील त्याची भूमिका अधोरेखित करण्यात आली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. तसेच संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ. संदीपकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पदभार स्विकारल्यानंतर कार्यकाळात डॉक्टर आणि रूग्ण यांच्या प्रकृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

स्त्रीरोग तज्ज्ञांची अशी आहे कार्यकारीणी
सन २०२६-२७ साठी स्थापित करण्यात आलेल्या संघटनेत अध्यक्ष – डॉ. संदीपकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. आशिषकुमार वाघ, सचिव – डॉ. शलाका पाटील, कोषाध्यक्ष – डॉ. गजानन पाटील, सह सचिव डॉ. दिप्ती नेहते, डॉ. दिपा रत्नानी, डॉ. कोमल सरोदे, वैद्यकीय सचिव डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पूनम येवले, डॉ. प्रथमेश जैन, सांस्कृतिक सचिव डॉ. मेधावी चौधरी, डॉ. श्रध्दा राणे, डॉ. चंदन महाजन यांचा कार्यकारीणीत समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories