झुलेलाल वॉटर पार्कच्या लॉकरमधून २ मोबाईल चोरी

जून 30, 2022 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शिरसोली येथील झुलेलाल वॉटर पार्कच्या लॉकरमधून १६ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime mobail jpg webp

शेख परवेज शेख उस्मान यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. परवेज व उस्मान यांचे १६ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल दि.२८ रोजी दुपारी १२ ते ३.३० वाजेच्या सुमारास शिरसोली येथील झुलेलाल वॉटर पार्कच्या लॉकरमधून कुणी तरी अज्ञात इसमाने चोरून नेले.

याबाबत एम आय डीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार भा.कलम ३७९प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेस्कॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now