जळगाव शहर

मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी जेडीसीसी बँक सुरु राहणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी कार्यरत असणारा दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सर्व कर्जदारांना मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच बँक कर्ज भरण्यासाठी दि. २६ व २७ मार्च या सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत.

तरी सर्व कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज भरणा वेळेत करुन, बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन जेडीसीसी बँकेमार्फत करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button