जळगाव जिल्हा
जयश्री महाजन मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन उद्या म्हणजेच मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यापूर्वी मंगळवारी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.