जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१। जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून ही परीक्षा शनिवार ३० एप्रिल २०२२ रोजी होईल.
जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ११.३० ते १.३० या कालावधीत ही परीक्षा होईल. सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करावे, पाचवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर.पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.