अज्ञात वाहनाच्या धडकेत जामनेरचा रिक्षा चालक ठार

जुलै 9, 2024 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । अज्ञात वाहनाने रिक्षा चालकाला जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जामनेर-पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. हेमंत समाधान माळी (महाजन वय २५, रा. शास्त्री नगर, जामनेर) असे मृत रिक्षा चालकाचे नाव असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

hemant mali jpg webp

हेमंत माळी हा जामनेर शहरात आई-वडील, दोन बहिणी यांच्यासह राहत होता. रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली आहे. दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता.तेथून मंगळवारी दि. ९ जुलै रोजी मध्यरात्री दीड ते २ वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली.

या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले. यावेळी नागरिकांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याघटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now