जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि. 21 पासून कडक निर्बंध लावण्यात आले असून यात अत्यावश्यक दुकान सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश आहे. अस असताना देखील जामनेर शहरात वेळेनंतर दुकान चालू ठेवणाऱ्या दुकानांना सील करण्याची कारवाई प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इगले, पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, नगरपालिका कर्मचारी दत्तू जोहरे आदी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यभर शासनाने कडक केले असून अत्यावश्यक सेवा मधील दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत चालू राहणार आहे. मात्र असे असतानाही वाकि रोडवरील काही दुकानदार आपली दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवले होते. अशा पाच ते सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर दुपारी अकरानंतर गावात फिरणाऱ्या रिकामटेकडे नागरिकां ना ठीक ठिकाणी आडून प्रशासनातर्फे त्यांची कोरणा चाचणी करण्यात आली. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता व मृत्यूचे दर वाढत असल्याकारणाने आता तरी नागरिकांनी घराचं थांबावे व लॉक डाऊन चा नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.