महाराष्ट्रराजकारण

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी फडणवीसांनी मागितली माफी, म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आणि एकूणच मराठा आरक्षणप्रकरणी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुरुवातीलाच राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता. या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो. क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेवरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी होते. काही तर म्हणाले, लाठीहल्ल्याचा आदेश मंत्रालयातून दिला गेला. अशा प्रकारचे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, लाठीहल्ला करण्याचे अधिकार हे एसपी, डीवायएसपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनाच असतात. त्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नसते.

ज्यावेळे निष्पाप ११३ मारले गेले त्यावेळेस मंत्रालयातून आदेश आला होता. तसेच मावळला शेतकरी गोळीबारात मृत्यूमुखी पडले त्यावेळी ते आदेश कुणी दिले होते का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते? मग त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही? सरकार हे करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

सरकार हे करतय हे दाखवण्याचा प्रयत्न होता लोकांना देखील कळतंय हे राजकारण सुरू आहे. 2018 साली आपण कायदा केला उच्च न्यायालयाने तो कायदा मान्य केला. देशात फक्त तमिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारचा कायदा केला. आमचे सरकार बदललं आणि 9 सप्टेंबरला 2020 ला स्थगिती आली. उद्धव ठाकरे एक वर्षे मुख्यमंत्री होते. 2021 पासून उद्धव ठाकरे तुम्ही वटहुकूम का काढला नाही? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button