⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | महाराष्ट्र | जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालय फोडले

जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालय फोडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२३ । जालन्यात मात्र धनगर समाजाच्या उपोषणाला हिंसक वळण लागलं आहे. धनगर आरक्षणासाठी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र यादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत येथील शासकीय वाहने, दुचाकी गाड्यांची तोडफोड केली.

राज्यभरात आज धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हाक दिल्यानंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात मोर्चे काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जात आहे. त्याचनुसार धनगर समाज बांधवांकडून जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघाला. पण जस जसं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आलं तसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

यावेळी संतप्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आत शिरले. आत शिरताच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुर्च्या उचलून फेकल्या. वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे एकच तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.