जळगावकरांनी थेट बांधकाम विभागात जाऊन लावली खड्यांची फोटो फ्रेम
जळगाव लाईव्ह न्यूज | २१ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरातील नागरिकांनी थेट बांधकाम विभागात जाऊन खड्यांची फोटो फ्रेम लावली आहे.जुने जळगाव परिसरातील मुख्य रस्ता (झाशीचे राणी चौक ते काऊ कोल्हे विद्यालय पर्यंतचा रास्ता व नेरी नका स्मशान भूमी रस्ता, जुनी काऊ कोल्हे शाळा) खूप खराब झाला आहे. पर्यायी ललित विजय नारखेडे , जिल्हा उपाध्यक्ष सुरजविजय नारखेडे जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी बांधकाम विभागात जाऊन खड्यांची फोटो फ्रेम लावली आहे. याच बरोबर त्यांनी निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील झाशीची राणी पुतळा ते कोल्हे शाळे पर्यंत व नेरी नाका स्मशान भूमी मागील वखार पासून ते जुनी काऊ कोल्हे शाळा पर्यंतचा रस्ता त्वरित चालू करण्यात यावा. या संधर्भात आपण नम्र निवेदन सदरील रस्त्याची कामाच्या पूर्वी परीक्षण व मोजमाफ झालेले असून सुद्धा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत कोणतेही लक्ष द्याला तयार नाही. याबाबत नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात होत असलेल्या धूळ प्रदूषणा मुळे नागरिक व सभोताली वातावरणात अतिशय खराब होऊन बदल होत आहे.
याबाबत तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे असून याचा आम्ही निषेद व्यक्त करतो. आपण रस्त्याची अवस्था एकदा बघून याबाबत तात्काळ निर्णय ध्यावा अन्यथा जुने जळगाव परिसर नेरि नाका परिसरातील नागरिक ,श्रीकृष्णानगर मधील नागरिक,झिपरू अण्णा नगर मधील नागरिक ,काऊ कोल्हे विद्यालय सभोवताली नागरिक याना सर्वाना घेऊन आम्ही याच रस्त्यावर ठिय्या अंदोलन किंवा धरणे आंदोलन करू.